भद्रावती : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे नुकतेच स्टेम लॅबचे उध्दघाटन करण्यांत आले. या स्टेम लॅबचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांचे हस्ते करण्यांत आले. याप्रसंगी जि.प.चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी (प्राथ) राजकुमार हिवारे, पं.स. भद्रावतीचे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी प्रकाश महाकाळकर, समग्र शिक्षा अभियान चंद्रपूरच्या उप अभियंता प्रियंका रायपुरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तथा माजी नगरसेविका शितल गेडाम, सदस्या तथा माजी नगरसेविका रेखाताई खुटेमाटे, मुख्याध्यापक अरविंद चौधरी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक यांनी विद्यार्थ्यांशी यथोचित संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना योग्य असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या उद्घाटन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अरविंद चौधरी, संचालन सहा.अध्यापक हिवंज सर यांनी तर आभार मुद्दमवार सर यांनी मानले.






