spot_img
spot_img
32.9 C
New York
Friday, August 7, 2026

अंतराळ यात्रेने विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढेल… डॉ कार्तिक शिंदे

🪷 यवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतराळ यात्रेचे यशस्वी आयोजन..

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे अंतराळ यात्रेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉक्टर कार्तिक शिंदे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा यात्रेचे आयोजन आवश्यक असल्याचे सांगितले.

अंतराळ संशोधन संस्था आणि विज्ञान भरती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळात यात्रा या कार्यक्रमाचे यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आयोजन 26 फेब्रुवारी 2024 ला यशस्वीरित्या संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष डॉ. कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती , प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य एम यु. बरडे, प्राध्यापक सौ. उज्वला वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते या यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी “विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक घडामोडी जाणून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले”. भद्रावती तालुक्यातील २० शाळांनी तसेच २००० विद्यार्थ्यांनी या अंतराळ यात्रेत भेट दिली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांची दोन गटात चित्रकला स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच रांगोळी स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंतराळ यात्रा बघीतली. रांगोळी स्पर्धेत प्रथम प्राप्ती आवारी, व्दितीय श्रृती खंडाळकर तर तृतीय खुशी वनकर यांनी पारितोषिक मिळविले. पोष्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक तनूजा तेलंग, व्दितीय क्रमांक कु साव, तृतीय क्रमांक संजीवनी किनेकर यांनी पटकाविले. पारितोषिक विजेत्या शाळांमध्ये कर्मवीर विद्यालय, घोडपेठ, यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा, विवेकानंद विद्यालय भद्रावती, यशवंत राव शिंदे विद्यालय, भद्रावती यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश पाटील, रवींद्र बनकर, रमेश चव्हाण तसेच शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!