भद्रावती
स्थानिक भद्रावती या ठिकाणी श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दोन दिवशीय चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोज रविवारला निळकंठराव शिंदे वरिष्ठ महाविद्यालय भद्रावती या ठिकाणी सकाळी ठीक 10:00 वाजता भद्रावतीशहरातील विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा घेण्यात येत आहे. या निबंध स्पर्धेमध्ये वर्ग चार ते नऊ पर्यंतअ गट तसेच इयत्ता दहावी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ब गटअशी निबंध स्पर्धा घेण्यात येत आहे. अ गटातील विद्यार्थ्यांकरिता निबंधाचा विषय (1)राजमाता राष्ट्रमाता मॉ साहेब जिजाऊ(2) छत्रपती शिवाजी महाराज(3) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजआणि गट ब मधील विद्यार्थ्यांकरिता (1) कर्तव्यनिष्ठ राजे छत्रपती शिवराय (2) शूर वीर मावळे स्वराज्याचे (3) गडकोट एक ऐतिहासिक वारसा व संवर्धन या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. अ गटातील विद्यार्थ्यांकरिता अनुक्रमे 1001,701,501रुपये तर ब गटातील विद्यार्थ्यांकरिता अनुक्रमे 1501,1001,701रुपये रोख स्वरूपात बक्षीस ठेवण्यात येत आहे.मानवंदनेच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नगर परिषद भद्रावती या ठिकाणी सकाळी ठीक 8:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात येईल.यानंतर लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आटोपल्या नंतर सकाळी ठीक 9:00 वाजता नगरपरिषद भद्रावती ते नाग मंदिर भद्रावती पासून परत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वारापर्यंत पारंपारिक पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची जाणीव ठेवण्याकरिता निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन, निघणाऱ्या या महा रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच संपूर्ण बांधवांनी सहभाग घ्यावा असे आव्हान श्री स्वराज्य वीरसंघटना भद्रावतीचे पदाधिकारीआणि संपूर्ण सदस्यांमार्फत करण्यात येत आहे.






