spot_img
spot_img
34 C
New York
Friday, August 7, 2026

भद्रावतीत राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेची थाटात सुरुवात

ढोल ताशाच्या गजरात पार पडला उद्घाटन सोहळा

भद्रावती : लक्ष फाउंडेशन भद्रावती तर्फे स्वर्गीय पंजाबराव शिंदे स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय T20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेची थाटात सुरुवात झाली. ढोल ताशाच्या गजरात उद्घाटन सोहळा पार पडला. स्पर्धेच्या उद्घाटनाकरिता प्रमुख अतिथींच्या हस्ते हवेत फुले सोडून एकात्मतेचे दर्शन घडविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भद्रावती रणजीत यादव तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार भद्रावती अनिकेत सोनवणे उपस्थित होते. तसेच लक्ष फाऊंडेशनचे संदीप शिंदे, रोहन कुटेमाटे, सुनील महाले, समीर बल्की, नकुल शिंदे, समीर बलकी, प्रशांत शिंदे, सचिन सरपटवार, अफजल भाई व अन्य सदस्य उपस्थित होते.

उद्घाटनपर सामन्यात वी. टी. सी. ए. नागपूर संघाने बेंगलोर ब्लास्टर संघावर मात केली. विजयी संघाचा रणजीखेळाडू नचिकेत भोगे मॅन ऑफ द मॅच ठरला. स्पर्धेचे आयोजन दिनांक ७ ते १८ फेब्रुवारी पर्यंत पिपराडे मैदान चंद्रपूर -नागपूर रोड येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत देशातील जबलपूर, लखनऊ, इटावा, बेंगलोर तेलंगणा तसेच राज्यातील जळगाव, नागपूर, चंद्रपूर येथील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा समावेश असणार आहे.

स्पर्धेचे प्रथम बक्षीस दोन लाख अकरा हजार रुपये तर द्वितीय एक लाख ११ हजार रुपये तसेच शील्ड असणार आहे. सोबतच व्यक्तिगत बक्षीस सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप शिंदे तर आभार सचिन सरपटवार यांनी मानले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!