भद्रावती –
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात भारतीय गणराज्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती नीलकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती मातोश्री यमुनाबाई शिंदे महिला महाविद्यालय भद्रावती डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती तसेच शिंदे प्राथमिक विद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय गणराज्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला व्यासपीठावर भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे , प्राचार्य डॉ एल एस लडके , माजी प्राचार्य मोहन पुस्तके तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डॉक्टर कार्तिक शिंदे यांनी आपण संविधानानुसार हक्क व कर्तव्याचे पालन केले पाहिजे त्यांची समाजाला आवश्यकता आहे असे सांगितले.
या वेळी एनसीसी पथकाची परेड झाली. विद्यार्थ्यांनी समयोचित भाषणे दिली. देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुधीर मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक महादेव ताजणे सर यांनी केले.






