spot_img
spot_img
34 C
New York
Friday, August 7, 2026

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात HIV AIDS व युवा वर्ग आणि मतदार जनजागृती

भद्रावती : स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर स्वर्गीय मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय, चोरा येथे सुरू असून चौथ्या दिवशीच्या बौद्धिक सत्रात एच आय व्ही एड्स आणि युवा वर्ग व मतदार जनजागृती या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एन. एस. वाढवे तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शीतल फडके आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय भद्रावती आणि राहुल राऊत नायब तहसीलदार भद्रावती तसेच राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलाने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शक डॉक्टर शितल भडके यांनी एच आय व्ही एड्स म्हणजे काय? या रोगांविषयी घेण्याची काळजी तसेच हा रोग होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी, त्याच पद्धतीने असलेले समज आणि गैरसमज याची माहिती असणे किती आवश्यक आहे. याविषयी विस्तृत अशी माहिती दिली.

तसेच राहुल राऊत नायब तहसीलदार भद्रावती यांनी मतदान म्हणजे काय त्याचे महत्त्व कसे आहे तसेच ईव्हीएम कसे हाताळायचे आणि मतदानामुळे आपल्या विभागातील भवितव्य कसे बदलू शकते तसेच मतदान हा संविधानाने आपल्याला दिलेला एक अधिकार आहे ज्याचा उपयोग सर्व भारतीयांनी केलेल्या पाहिजे असे आपले मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एन. एस. वाढवे यांनी देशाला प्रगत करण्यासाठी स्वस्त आरोग्य त्यासाठी युवकांमध्ये एड्स विषयी जनजागृती तसेच मतदान जनजागृती याची किती गरज आहे आज समाजामध्ये असे आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता शेडमाके व आचल राऊत तर आभार प्रदर्शन शुभम आसमपलीवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील शरद भावरकर तासेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अथक परिश्रम केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!