वरोरा : तालुक्यातील मोठे पोलीस स्टेशन म्हणन ओळखले जाणारे शेगाव पोलीस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी बुधवारी पदभार सांभाळलं असून जवळपास १०२ गावाची धुरा त्यांच्यावर आलेली आहे.
सहाय्यक पोलिस निरिक्षक ठाकरे हे मूळचे तुमसरचे असून आतापर्यंत त्यांनी अचलपूर, अंजनगाव, यवतमाळ, अकोला मध्ये असताना सायबर गुन्हे शाखेत व बल्लारशा येथे सुद्धा आपले कार्य बजावले असून आता त्यांच्याकडे शेगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलिस निरिक्षक म्हणून आलेली जबाबदारी ही अतिशय आव्हानात्मक असली तरी सुद्धा, त्यांनी आपल्या कर्तव्य अधिकाऱ्याच्या योग्य वापर करुन त्यांच्याकडून सर्वसामान्य ग्रामीण जनतेला निश्चितच न्याय मिळेल अशीच अपेक्षा जनतेला लागलेली आहे.

शेगाव परिसरात अवैध्य रेती उत्खनन, वाहतूक, गौण खनिज उत्खनन, सट्टापट्टी, अवैद्य दारू विक्री, यावर अंकुश लावण्याचे आव्हान ते कशाप्रकारे स्विकारतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.






