शेगाव : केंद्र सरकारच्या नवीन हिट अँड रन कायदा ज्या मध्ये ७ लाख दंड व १० वर्षे शिक्षेची तरतूद केली आहे. हा काळ्या कायद्याच्या विरोधात सध्या संपूर्ण भारतभर विविध संघटणांनी तसेच ड्राइवर भावांनी स्टेरिंग छोडो आंदोलन आज दि. १० जानेवारी पासून सुरू केले आहे. जो पर्यंत हा कायदा रद्द करून लिखित मध्ये सरकार मधून अमित शहा किंवा परिवहन मंत्री प्रसारमध्यमासमोर जाहीर करणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भुमिका समपूर्ण देशातील ड्राइवर भावांनी घेतली आहे.

याच कायद्याच्या विरोध म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बु मधील सुद्धा ड्राइवर भावांनी आज संपूर्ण दिवस वाहने जागेवरच उभी ठेऊन स्टेरिंग छोडो आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच जो पर्यंत हा काळा कायदा मागे घेणार नाही तो पर्यंत आंदोलन हे अश्याच प्रकारे सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. या आंदोलना दरम्यान सर्व ड्राइवर भावांनी रस्त्यावर उतरत कायद्याचा निषेध केला तसेच ज्या ड्राइव्हर भावांनी आज गाडी चालवली त्यांना फुलाचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.






