spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

तब्बल २५ वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र

भद्रावती : विद्यार्थी कितीही मोठ्या पदावर गेला तरी आपली शाळा मनात घर करून राहते. मैत्री शाळेतील बाकांवरची, आठवणींच्या नात्यांची याचाच प्रत्यय दि. ७ जानेवारी रविवार ला जि. प. हायस्कूल, भद्रावती येथे सत्र १९९७-९८ मध्ये शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित स्नेह मिलन (रोप्य महोत्सव) कार्यक्रमात आला. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक गावंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. हायस्कूल भद्रावती चे विद्यमान मुख्याध्यापक चौधरी होते. तसेच मंचावर सर्व सत्कारमूर्ती माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व माजी शिक्षकांचे प्रवेशद्वारावर गुलाब पुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात शालेय परिसरात आगमन झाले. त्यानंतर सर्व शिक्षकांचे शाल, श्रीफळ, भेटवस्तू व रौप्यमहोत्सव स्नेह मिलनाचा लोगो असलेले मोमेंटो देऊ स्वागत करण्यात आले.ह्या कार्यक्रमात माजी शिक्षक गोवर्धन, पवार, भोयर व मोडक यांनी त्या काळातील शालेय शिस्त, प्रशासन तसेच विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची जिद्द ह्यावर काही गंमतीदार किस्से सांगून कार्यक्रमात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली. ज्यांच्या अनुशासनाने, कार्यतत्परतेने, तसेच विद्यार्थी हिताच्या दूरदृष्टी निर्णयाने सतत पंधरा वर्षे शाळेला चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सन्मान मिळवून दिला असे त्यावेळी चे कर्तृत्ववान मुख्याध्यापक गावंडे सरांनी विद्यार्थी दशेत शालेय शिस्त का बरं महत्त्वाची असते व ह्या शिस्तीमधून घडलेला माझा विद्यार्थी हा आजचा सुजाण नागरिक असून त्यांनी समाजातील सर्व शोषित पीडित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रण घ्यावा असे अध्यक्षीय भाषणातून संबोधले.

रोप्य महोत्सवी स्नेह मिलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्रपाली ब्राह्मणे व अमित माणूसमारे यांनी केले. तसेच कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या स्वागताचे सूत्रसंचालन आशीष आकोजवार व धीरज मजगवळी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण ठेंगणे व आभार प्रदर्शन मीनाक्षी नारळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व माजी विद्यार्थ्यांनी मदत केली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!