spot_img
spot_img
26.1 C
New York
Friday, August 7, 2026

पिपरबोडीच्या युवकांनी दिले अजगराला जीवनदान

भद्रावती : नागपूर – चंद्रपूर महामार्गावरील गौतम नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरून महामार्ग पार करीत असताना ८ फूट लांबीच्या अजगराला जवळपास ४ जड वाहतूक करणाऱ्या वाहनातून पिपरबोडी व गौतमनगरच्या युवकांनी त्या अजगराला वाचविले. जर का युवक धावून गेले नसते तर अजगराचा चेंदा मेंदा झाल्याशिवाय राहिला नसता.

ही घटना दि .८ डिसेंबरच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.अजगर हा अंदाजे साडे ४ वर्षाचा असून ८ फूट लांबीचा असल्याची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे यांनी दिली. पिपरबोडी येथील श्रीनिवास कॉलनीडी, बाबू चेट्टी, आदी कॉलनिडी, प्रतीक कावळे व सतीश पिडगु या युवकांनी अजगराला पकडुन वनविभाग कार्यालयात आणून सदर अजगराची नोंद केली व त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष जंगलात निर्जनस्थळी नेऊन निसर्ग मुक्त केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!