spot_img
spot_img
21.2 C
New York
Friday, July 31, 2026

भद्रावती येथे वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 55 व्या पुण्यतिथी महोत्सवा निमीत्त विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमाचे आयोजन


वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे ५५ पुण्यतिथी महोत्सव दिनांक २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३पर्यंत विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी लोकमान्य विद्यालय चे प्रांगणात संपन्न होत आहे.
दिनांक २९ डिसेंबर रोज शुक्रवारला सकाळी ५.३० वाजता शेषानंद पांडे महाराज यांचे हस्ते श्रीगुरुदेव अधिष्ठानाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल, यानंतर सायं. ५.३० वाजता सामुदायिक प्रार्थना होईल, याप्रसंगी रुपलालजी कावळे वरोरा यांचे मार्गदर्शन होणार असून सायं.ठीक ७.०० वाजता राष्ट्रसंतांची खंजेडी भजन व यानंतर रात्रौ. ठीक ८.०० वाजता चेतनदादा ठाकरे व संच आरमोरी यांचा पंचरंगी विनोदी भारुडाचा कार्यक्रम होईल.

दिनांक ३० डिसेंबर रोज शनिवारला सकाळी ९.०० श्री.अरविंदजी राठोड , गुरुकुंज आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांची परिसंवाद स्पर्धा संपन्न होईल या स्पर्धेकरिता प्रमुख अतिथी म्हणून गोपालजी कडू ,संकेत काळे महाराज उपस्थित राहतील, दुपारी ठीक १.०० वाजता महिला संमेलन सौ. बेबीताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून याप्रसंगी ह.भ.प. कविताताई चांदेकर ,नांदगाव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल, महिला संमेलन प्रसंगी निर्मलाताई खडतकर, कविताताई येनुरकर, साक्षीताई पवार, संध्याताई विरमलवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, याप्रसंगी गरीब व गरजू व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येणार आहे,सायंकाळी ५.३० वाजता सामुदायिक प्रार्थना होईल या प्रसंगी मनोज महाराज चौबे चिंतन प्रकट करतील यानंतर सायं.७.४५ ला राज दादा घुमणार यांची व्याख्यानमाला होईल, रात्रौ ठीक ८.०० वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकज पाल महाराज व संच,वाशिम यांचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम होईल, दिनांक ३१ डिसेंबर रोज रविवारला सकाळी ७.०० रामधून निघेल व याप्रसंगी श्री.रवींद्रजी ढवळे यांचे मार्गदर्शन होईल, दुपारी १२.०० वाजता व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प. मधुकरराव खोडे (खराटे) महाराज यांचा कीर्तन व गोपालकाला कार्यक्रम संपन्न होनार असून गोपालकाला प्रसंगी आचार्य श्री. हरिभाऊ वेरुळकर गुरुजी गुरुकुंज आश्रम, लक्ष्मणरावजी गमे सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी, सौ. प्रतिभाताई धानोरकर आमदार भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्र, मा. हंसराज भैय्या अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, मा.रविंद्र परदेशी,पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा.सेवकरामजी मिलमिले,पंढरपूर यांचे मार्गदर्शन होईल याप्रसंगी मंडळाचे दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली,तसेच सेवा गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. सायं. सामुदायिक प्रार्थना प्रसंगी प्रा.अशोकजी चरडे चिमुर चिंतन प्रगट करतील, यानंतर रात्रौ ठीक ८.३० वाजता झी मराठी, सोनी मराठी, कलर्स मराठी फेम युवा शाहीर रामानंद उगले व संच जालना यांचा महाराष्ट्राची लोकगाणी व पोवाडा या सुप्रसिद्ध कार्यक्रमांनी महोत्सवाची सांगता होईल.


पुण्यतिथी महोत्सवातील सामाजिक उपक्रमामध्ये दिनांक ३० डिसेंबर २०२३ ला रात्री ८.०० वाजता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ नागपूरचे तज्ञ मार्गदर्शक डॉ.मनीष माथनकर यांचे कर्करोग प्रतिबंध लक्षणे , उपचार संबधाने सरकारी योजनेची माहिती यावर मार्गदर्शन होणार आहे तसेच राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या सर्व कार्यक्रमाचा व उपक्रमाचा सर्व जनतेनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे वतीने करण्यात येत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!