भद्रावती : क्रीडा पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथे स्व. वसंत देसाई जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीची खेळाडू कु. रितीका समीर बोस उत्तम क्रीडा कौशल्य दाखवत राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त केले.

विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी १९ वर्ष वयोगट खालील बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर यश संपादन केले, कु. रितीका समीर बोस या खेळाडूंनी यशाचे श्रेय महाविद्यालयाला दिले आहे. महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जंयताभाऊ टेंमुर्डे, सचिव अमनभाऊ टेंमुर्डे, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती चे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आस्टुनकर, प्रा. डॉ. टोंगे, प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, प्रा. डॉ. तितरे, प्रा. डॉ. घुमे, प्रा. मोहित सावे, प्रा. मालेकर, प्रा. कापगाते, प्रा. लांबट, अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर, डॉ. बी. प्रेमचंद, अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना, डॉ. राकेश तिवारी, महासचिव महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, एडवोकेट मिलिंद रायपुरे, अध्यक्ष भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटना, श्री. विजय डोबाळे, महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक, डॉ. बगडे, डॉ. अमित प्रेमचंद, अमर भांडारवार, लता इंदुरकर, भद्रावती तालुका बॉक्सिंग प्रशिक्षक, अलोका बिश्वास तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त केल्याबद्दल खेळाडूचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.






