spot_img
spot_img
24.2 C
New York
Tuesday, August 4, 2026

भद्रावती पर्यटन नगरीमध्ये रोटरी 3030 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आशा वेणुगोपाल यांचे स्वागत

रोटरी क्लब भद्रावतीच्या ऑफिशियल क्लब व्हिजिट साठी भद्रावतीला आलेल्या रोटरी डिस्ट्रिकच्या प्रांतपाल आशा वेणू गोपाल आणि सह प्रांतपाल संगीता इंगळे यांनी भद्रावतीच्या रोटरी क्लब ला भेट देवून संवाद साधला. माजी अध्यक्ष डॉ माला प्रेमचंद, रोटरीचे अध्यक्ष अनिल धानोरकर, सेक्रेटरी सुधीर पारधी, कोषाध्यक्ष विक्रांत बीसेन यांची बैठक घेऊन कागदपत्रे तपासली. रोटरी फी, रोटरी मेंबर फाउंडेशन मदत, मॅगझिन फी यासोबत कागदपत्राची तपासणी केली. तसेच आजपर्यंत झालेले उपक्रम व चालू असलेले उपक्रम त्यामध्ये शिवणकला केंद्राला भेट देऊन तिथे बनत असलेल्या कपडे आणि सॅनिटरी पॅड ची पाहणी केली.

या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती घेऊन क्लब सदस्या सोबत बैठक घेऊन तालुक्यातील शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या काय काम अति महत्त्वाचे आहे याबाबत विचारणा केली. यावेळी सदस्यांनी डायलिसिस सेंटर सुरू करण्याची गरज आणि महत्त्व पटवून दिले. तसेच आपल्या ऑफिशियल क्लब व्हीजीट मध्ये त्यांनी मतिमंद विद्यालयांमध्ये भेट दिली. विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी रोटरीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!