भद्रावती : ऑल इंडिया सिलांबम फेडरेशन व तामीळनाडू स्टेट सिलांबम असोसिएशन द्वारा सेंट जोशेफ सायन्स कॉलेज, कुडालोर, तामिळनाडू येथे ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय सिलांबम चॅम्पियनशिप मध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील खेळाडू यांनी प्रथमच सहभाग घेत ३ सिल्व्हर व ३ ब्रॉंज मेडल प्राप्त केले.

ऑल चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशन या अधिकृत व एकविध मान्यताप्राप्त जिल्हा सिलांबम असोसिएशन च्या क्रिश बंडू भोस्कर, अंडर १९ वर्ष ७० किलो खालील वजनगटमध्ये सिल्व्हर मेडल, दीक्षांत दुर्गराज रामटेके, अंडर १४ वर्ष ३० किलो खालील वजनगटमध्ये ब्रॉंज मेडल, अथर्व रामेश्वर पातसे अंडर १४ वर्ष ४५ किलो खालील वजनगटमध्ये ब्रॉंज मेडल, शोर्या शेखर रामटेके, १८ वर्ष वयोगटाखालील ६५ किलो खालील वजनगटामध्ये ब्रॉंज मेडल, कु. दिव्या विजय गेडाम १८ वर्ष वयोगटाखालील ४५ किलो खालील वजनगटामध्ये सिल्व्हर मेडल, कु. तंनू हिरालाल आडे, १८ वर्ष वयोगटाखालील ४० किलो खालील वजनगटामध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले. या खेडाळुंनी आपल्या सिलांबम (लाठीकाठी) खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून चंद्रपूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर हे ऐतिहासिक यश प्राप्त करून दिलेले आहे.

खेलो इंडिया क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त तसेच शालेय व युनिव्हर्सिटी खेळ म्हणून मान्यताप्राप्त प्राचीन भारतीय पारंपरिक शस्त्र कला खेळसिलांबम (लाठीकाठी) या खेळाच्या चंद्रपूर जिल्ह्यात नियोजित विकास व प्रसार जिल्हा सिलांबम असोसिएशनचे अध्यक्ष वाल्मिक खोब्रागडे व जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. दुष्यंत य.नगराळे (जेष्ठ क्रीडा संगठक) यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.सर्व विजेत्या खेळाळूनी आपल्या यशाचे सर्व श्रेय चंद्रपुर जिल्ह्यातील मार्शल आर्टस् क्रीडा प्रकाराचे मार्गदर्शक व जिल्हा सिलांबम असोसिएशनचे संस्थापक व सचिव रेंशी दुर्गराज एन. रामटेके व सिलांबम खेळाचे संघटक रामेश्वर पातसे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्ह्यातील सिलांबम खेळाडू प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभाग घेतल्याने रामटेके व पातसे यांना दिलेले आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, क्रीडा मार्गदर्शक विजय ढोबाळे, संदीप उईके, सिलांबम फेडरेशन चे राज्य प्रमुख मास्टर संजय बनसोडे,जिल्हा सिलांबम असोसिएशनचे अध्यक्ष वाल्मिक खोब्रागडे, उपाध्यक्ष प्रा. दुष्यंत नगराळे, डॉ. विशाल शिंदे, ॲड. युवराज धानोरकर, प्रीतम सोनावणे, पांडुरंग भोयर, प्रा. रमेश चव्हाण, प्रा. संगीता बांबोडे, श्रीहरी गसकंटी, बंडू करमनकर, शितल रामटेके, करण डोंगरे, संजय माटे, मनीष भागवत, निर्दोष दहिवले, गौतम भगत, आयुषी रामटेके, विकास दुर्योधन, करण नेवारे, शेखर रामटेके, शंभू वाघमारे, संदीप पंधरे, माधवी बोधाने,पलक शर्मा, आचल हिवरकर, आर्या कामरे यांनी सर्व खेळाडू यांना सर्व विजेत्याना शुभेच्छा देवुन अभिनंदन केले.






