भद्रावती : शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने नुकतेच गणपती विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे )वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शन पक्षाच्या वतीने शहरातील सर्वच बत्तीस गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शहरातील गांधी चौकात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने मंडप उभारण्यात आला. या मंडपात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बत्तीस गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, तालुका प्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, जेष्ठ शिवसैनिक रामभाऊ पेटकुले, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, उप-जिल्हा संघटीका माया नारळे, युवा सेना अधिकारी राहुल मालेकर ,शिवसेना तालुका महिला आघाडीच्या पदाधिकारी शिला आगलावे, भावना खोब्रागडे, माया टेकाम, सुनिल मोरे, उपशहर प्रमुख अरुण घुगुल, रोहण कुटेमाटे, विश्वास कोंगरे, संतोष माडेकर, मनिषा जुनारकर, रजनी डंभारे, जेष्ठ शिवसैनिक प्रशांत कारेकर, प्रसिध्दी प्रमुख रवी कावळे, मनोज पापडे, भुमेश वालदे, सतिश वरखेडे, राहुल खोडे आणि महेश यादव यांच्यासह भद्रावती तालुका आणि शहर पदाधिकारी तसेच शिवसैनिक बंधू भगिनी फार मोठया संख्येत उपस्थित होते.






