भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १ ऑक्टोंबर रोज रविवारला सकाळी १० वाजता “स्वच्छता ही सेवा” या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे यांच्या शुभहस्ते अभियानाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला.

याप्रसंगी महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे, डॉ रमेश पारेलवार यांनी केले होते. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या स्वच्छता अभियानात डॉ.विजय टोंगे, डॉ.ज्योती राखुंडे, डॉ सुहास तेलंग, डॉ यशवंत घुमे, प्रा.रामकृष्ण मालेकर, प्रा.सुभाष खोके, प्रा श्रीकांत दाते, प्रा.राजीव बैरम, प्रा.अमोल ठाकरे, गौतम खोब्रागडे, गणेश गौरकर इत्यादींसाठी अनेकांची उपस्थिती होती.






