भद्रावती : नगर परिषदेचे नगरसेवक तथा भाजपचे भद्रावती शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१ ऑक्टोबर रविवारला सकाळी ११ ते २:०० वाजेपर्यंत स्थानिक हुतात्मा स्मारक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तथा नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहमंत राज्यमंत्री हंसराज अहिर हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, रमेश राजुरकर करण देवतळे, विजय राऊत, खुशाल बोंडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरात बालरोग तज्ञ डॉक्टर भावेश मुसळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. दिपाली मुसळे व अस्थिरोग तज्ञ डॉ. विनोद मुसळे, किडनी तज्ञ डॉ. राकेश अंबाती व डॉ. रागीनी राव अंबाती, हृदयरोग तथा मधुमेह तज्ञ हे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहे. याशिवाय शिबिरात नवीन मतदार नोंदणी तथा ज्यांच्या नावाची मतदार यादीत नोंद नाही अशा मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. या दोन्ही शिबिराचा लाभ शहरातील रुग्णांनी तथा नव मतदारांनी घ्यावा असे आवाहन प्रशांत डाखरे मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.






