भद्रावती : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पंचायत समिती भद्रावतीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. ही स्पर्धा येथील लोकमान्य विद्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यात तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थीनी मोनाली खांदारे, दिव्या मत्ते आणि हिमांशा नक्षिणे यांनी त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका मिनाक्षी वासाडे आणि प्रिया भास्करवार यांच्या मार्गदर्शनात उत्तम चवदार वेजपुलाव तयार करून पाककृतीचे उत्तम सादरीकरण केले. त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गट समन्वयक एम. एम. विद्दे, विषय साधन व्यक्ती अरविंद गायकवाड आणि संध्या भगत यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धकांना भद्रावती पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश महाकाळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी गट साधन व्यक्ती विद्या कवाडे, छाया खनके, प्रतिभा कवाडे, डाटा आपरेटर घनश्याम कुटेमाटे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. पाककृती स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थिनींचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य मनोहरराव पारधे, गोपाळराव ठेंगणे, उमाकांत गुंडावार, अविनाश पाम्पट्टीवार, आशिष गुंडावार, संजय पारधे, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.






