शेगाव:- दिनांक २३ सप्टेंबर ला क्रीडा संकुल चंद्रपूर येथे शालेय जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंडर १४ मधून मुली मद्ये विभाग करीता एकूण ५ मुलींची निवड करण्यात आली. या मधे नेहरू विद्यालय शेगाव (बु) येथिल वर्ग ८ वी ची विद्यार्थिनी कुमारी चांदणी शर्मा ही साडे चार गुण घेत विभागीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड झालेली आहे. प्रथम परिणीता आर्डे, द्वितीय दीपिका जामुनकर, तृतीय लावण्या बोरकुटे तर चतुर्थ चांदणी शर्मा, पाचवी गुंजन वलके हे सर्व चंद्रपूर जिल्हा चे प्रतिनिधित्व करणार आहेत. या ५ मुली मधून दीपिका जामुनकर, चांदणी शर्मा, गुंजन वलके या वरोरा तालुक्यातील असून ग्रामीण भागात शिकतात. २०२२ ते २०२३ या सत्रा मद्ये फीडे रेटिंग प्राप्त नरेन्द्र गुरुदास कन्नाके यांनी वर्षभर प्रशिक्षण सोबतच निवड स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. याचाच फायदा या मुलींना झाला असून भविष्यात नक्कीच यश संपादन करतील अशी आशा आहे. निवड झाल्या बद्दल मुख्याध्यापक बी. जी. ढाकुणकर, प्रशिक्षक नरेंद्र कन्नाके, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले आहे.






