बालिका बचावली..
दिनांक 24 सप्टेंबर 2023 ला भद्रावती येथे सायंकाळी ६ च्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. तेव्हा भद्रावतीचीच एक आठ वर्षाची मुलगी बस स्टँडच्या समोरील नाली मध्ये कोसळली व ती बंदिस्त नालीतून ४००-५०० मीटर वाहून गेली. चारशे पाचशे फुटावर ती एका नाली वरील फरशीला धरून वाचवा वाचवा म्हणून ओरडली. तशातच एक देवदूत तिथे अवतारला त्याचं नाव छगन बुरडकर हा ऑटो चालक, याला तिचे हाताची बोट दिसली. त्याने त्या बोटांना पकडून बाकी लोकांना मदतीस बोलावले व नाली वरती सिमेंट काँग्रेसचे झाकण उचलून त्या मुलीला बाहेर काढले.
या वेळी मदत करणाऱ्यांना त्या मुलीच्या आई-वडिलांनी त्यांचे खूप खूप आभार मानले . आज एक मुलगी प्रसंगावधान राखून आपले जीवन वाचवण्यात यशस्वी झाली. त्या वाचवणाऱ्या छगन बुरडकर यांचे खूप खूप आभार. हल्ली आज आपण पाहतो वाचवण्यापेक्षा फोटो काढण्यास जास्तीत जास्त लोक धावतात. परंतु त्यांनी फोटोचा ध्यास न करता मुलीला जीवनदान दिले आहे.






