शिंदे महाविद्यालयाचे खेळाडू विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार..
क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय चंद्रपूर यांच्यावतीने आयोजित जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सिलंबम क्रीडा प्रकारात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती च्या विद्यार्थीनींनी उत्तम खेळाचे कौशल्य दाखविल्याने त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेत त्या चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या विद्यार्थीनींनी १७ वर्षे वयोगटातील सीलंबम क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर यश संपादन केले. कु. पलक नागपुरे व हनीप्रिया बाभुळकर यांनी उत्तम क्रीडा कौशल्य दाखविल्याने त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी १९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये शिलंबम क्रीडा प्रकारात अव्वल ठरली. कु. कन्याका प्रदीप राऊत हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला व ती विभागीय स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आपल्या क्रीडा कौशल्याचे नैपुण्य दाखवत विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनी, खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ . कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, प्राध्यापक डॉ .ज्ञानेश हटवार, माधव केंद्रे ,किशोर ढोक आणि प्राध्यापक मंडळींनी विजयी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. सदर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे व क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण यांना दिले.






