झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
जगातील वंचितांच्या व दुःखीतांच्या वेदनेवर साहित्यातून फुंकर घालून चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल असे साहित्य निर्माण व्हावे. तेव्हाच साहित्यिकाला समाधान वाटले पाहिजे. असे साहित्य साहित्यिकांच्या लेखणीतून उतरले पाहिजे असे प्रांजळ मत कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. विकास आमटे यांनी काढले.
झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली वरोरा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेला झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन व पुस्तक लोकार्पण सोहळा निजबल इमारत संधी निकेतन आनंदवन, वरोरा येथे संपन्न झाला. हा देखणा नेत्रदीपक सोहळा दिग्गज मान्यवर व जिल्हाभरातील साहित्यिकांच्या उपस्थितीत थाट याप्रसंगी आनंदवनचे डॉ. विकास आमटे उद्घाटक, विशेष अतिथी पद्मश्री, डॉ. परशुराम खुणे नाट्य कलावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडोपंत बोडेकर ग्रामगीताचार्य , आचार्य ना. गो. थुटे सर , सुधाकर कडू , रत्नमालाताई भोयर, अरुण झगडकर जिल्हाध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर, पंडित लोंढे अध्यक्ष वरोरा हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थितीत होते. झाडीबोली वरोरा तर्फे मान्यवरांचा सत्कार सन्मान चिन्हासह करण्यात आला.
याप्रसंगी सु. वि. साठे लिखित “गीतांगण” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तर बंध – संबंध या आचार्य ना.गो. थुटे लिखित काव्यसंग्रहाचे लोकार्पण पार पडले. भाष्यकार मदनराव ठेंगणे व सुभाष उसेवार यांनी आपल्या सुक्ष्म परीक्षणातून या ग्रंथावर भाष्य केले. जिल्ह्यातील 16 मान्यवरांना साहित्य व समाजकार्यात विशेष काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
त्यात “झाडी विशेष गौरव पुरस्कार” आनंदवनचे दिव्यांग साहित्यिक रमेश बोपचे यांना देवून गौरविण्यात आले.
झाडीबोली शब्दसाधक पुरस्कार देऊन प्रा. नामदेव मोरे चंद्रपूर , प्रकाश कोडके चिमूर, जयंत लेंजे शिंदेवाही, शीतल कर्णेवार राजुरा, सुनील बावणे बल्लारपूर, मंगला गोंगले सावली , वृंदा पगडपल्लीवार मुल, डॉ. अर्चना जुनघरे जिवती, सुजित हुलके पोंभुर्णा, संगीता बांबोळे गोंडपिंपरी, धनंजय पोटे ब्रह्मपुरी, महादेव हुलके कोरपना, वंदना बोढे भद्रावती, विजय भासारकर वरोरा इत्यादी साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. तर विनोद देशमुख घाटकुळ, संतोष मेश्राम ब्रह्मपुरी यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
संधी निकेतनचे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, माधव कौरासे यांना त्यांच्या वाढदिवसासह सेवा कार्याबद्दल सन्मानित करण्यात आला. सर्व पुरस्कार घोषित मान्यवरांचा सन्मान आनंदवन निर्मित महावस्त्र, पुष्पपात्र , सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र यासह कारण्यात आला. आनंदवन संधी निकेतन चे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांच्यातर्फे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा सन्मान करण्यात आला. झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा शाखेने ह्या नेत्रदीपक सोहळ्याचे यशस्वीरित्या आयोजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक शिव व चंद्रशेखर कानकाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ.भारती लखमापूरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदवन येथील संधी निकेतनचे अधीक्षक तथा मंडळाचे रवींद्र नलगिंटवार , दीपक शिव , रमेश बोपचे, अश्विनी मॅडम, मुकेश पिंपरे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्यांचे अथक परिश्रमातून, सहकार्यातून हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला जिल्हाभरातील साहित्यिक मंडळी व साहित्य प्रेमी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते. या सोहळ्याला आनंदवन परिवाराकडून उपहाराची व चहा पाण्याची व्यवस्था झाली .






