क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर च्या वतीने तालुका क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय प्राप्त केला. ते भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्यास्तरावर करणार आहेत.
विवेकानंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धत १९ वर्ष वयोगटातील उपांत्य सामन्यात मुलांच्या संघाने प्रथम फेरीत फेरील्याॅंड विद्यालय भद्रावती च्या संघाचा दारून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. अंतिम सामन्यात विवेकानंद महाविद्यालयाच्या संघाचा एकतर्फी पराभव करत तालुकास्तरावर आपला विजय संपादित केला. आता शिंदे महाविद्यालयाचा हा संघ जिल्हा स्तरावर भद्रावतीचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
या क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे तसेच प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार , किशोर ढोक, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण , माधव केंद्रे , समस्त प्राध्यापक यांनी अभिनंदन केलेले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे श्रेय प्राचार्य डॉ जयंत वानखेडे व क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक रमेश चव्हाण यांना दिले .






