वॉटर फिल्टर प्लान्ट बनले शोभेची वस्तू
वरोरा : शेगाव (बु) हे तालुक्यातील सगड्यात मोठे गाव आहे. पण जेवढे मोठे गाव तेवढ्याच मोठ्या समस्यानी ग्रासलेले हे गावं आहे. गावातील नागरिक सध्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवन फिरत आहे. तसेही शेगाव येथील पाणीपुवठा हा अनियमित असून पावसाळा असो कि उन्हाळा नळाचे पाणी पुरवठा ४ ते ८ दिवसा नंतरच होतो. उन्हाळ्यात तर हेच नळाचे पाणी १० ते १५ दिवसातून एकदा होतो. सध्या पावसाळा सुरू असून सुद्धा शेगाव वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्याची आठवडा भर वाट पहावी लागते. त्यामुळे एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी येऊन सुद्धा शेगाव वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कधी? हा प्रश्न निर्माण होत आहे.
गावामध्ये ४ वॉटर फिल्टर प्लांट आहे पण त्यातील जुने ३ प्लांट नावापुरतेच असून ते शोभेची वस्तु बनलेले आहे व एकच नवीन असलेला प्लांट सुरू आहे त्यामुळे आता या सगड्यावर लवकरात लवकर काही तरी उपाय योजना करावी अशी मागणी गावकारी करीत आहे.







