भद्रावती येथे दिनांक 19/08/2023 रोजी निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग व आल रिलीजन युथ क्लब भद्रावतीच्या संयुक्त विद्यमानाने भद्रावती येथे कै. स्व. निळकंठराव शिंदे (माजी आमदार) तथा संस्थापक सचिव भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांच्या स्मृति प्रीत्यर्थ भव्य रक्तदान कार्यक्रम आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांनी, “रक्तदानाचे मानवी जीवनात उपयोग व रक्तदानामुळे शारीरिक स्वास्थ सुदृढ कसे ठेवता येते” यावर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल शिंदे सहसचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती हे उपस्थित होते.
“रक्तदान हे श्रेष्ठदान” आहे यावर डॉ विशाल शिंदे यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाला भद्रावती येथील श्री. अजय आसूटकर, श्री. सूरज दखणे, श्री. अजिज शेख, श्री. शुभम शिंदे, श्री. विशाल गौरकार, तसेच आॅल रिलीजन युथ क्लब भद्रावतीच्या वतीने श्री. नितेश बानोत, श्री. जय राजभर, आतिश डोंगरे व इतर सदस्य मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबीरात अनेकांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.






