spot_img
spot_img
24.1 C
New York
Monday, August 3, 2026

वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार तर दुसरी जखमी.

भद्रावती तालुक्यातील घटना..

भद्रावती तालुक्यातील चारगाव, कुरोडा परिसरातून आलेल्या वाघाने शहरातील केसुर्ली परिसरात आपला तळ ठोकला असून या वाघाने केसुर्ली परिसरातील एका शेतात एका गाईला ठार मारले असून दुसरीला जखमी केल्याची घटना भद्रावती शहरालगतच्या केसुर्ली शेतशिवारात घडली. यात सदर शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

केसुर्ली शिवारातील राजू खामकर यांची शेतात त्यांची एक जर्सी गाय व एक संकरित जर्सी गाय चरत होती. दुपारच्या वेळेस वाघाने या गायींवर हल्ला केला. त्यात एका गायीचा मृत्यू झाला तर दुसरी गाय जखमी झाली. दुधाळ गाय असल्याने शेतकऱ्याचे नुकसान झालेला आहे या घटनेचा वनविभागातर्फे पंचनामा करण्यात आला. त्यानंतर या स्थळावर कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर या कॅमेरा मध्ये सदर वाघ कैद झाला आहे. हा वाघ गेल्या आठवड्यापासून शहरालगत फिरत आहे. पालिकेच्या घनकचरा प्रकल्पालगत याच वाघाने आठवड्यापूर्वी दर्शन दिले होते.मात्र हा वाघ अद्यापही शहरालगत फिरत असल्यामुळे शहरातील केसुरली व विंजासन भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील नागरिकांना बाहेर फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन भद्रावती नगरपालिका प्रशासनाने केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!