शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती च्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात डॉ कार्तिक शिंदे सचिव, डॉ वैभव शिंदे, विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती , प्राचार्य डॉ लेमराज लडके सर , प्राचार्य डॉ जयंत वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी ध्वज गीत, महाराष्ट्र राज्य गौरव गीत सादर केले. डॉ कार्तिक शिंदे यांनी “ज्या शूर, वीर, क्रांतिकारकांच्या बलिदानाने आपल्या देशाला स्वतंत्र मिळाले, त्यांचे हौतात्मे सतत प्रेरणादायी राहील. आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असले पाहिजे , “असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर मोते यांनी केले , तर आभार प्रदर्शन आत्माराम देशमुख यांनी केले . कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत चालविलेल्या सगळ्याच शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






