मतदार जागृती अभियान व मेरी माटी मेरा देश कार्यक्रम..
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे क्रांती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी “क्रांतिवीरांच्या बलिदाना मुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सजगता बाळगायला हवी,”असे मार्गदर्शन केले.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून ‘क्रांती दिन सोहळा’, ‘मतदार जागृती अभियान’, ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रम महाविद्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी डॉ. ज्ञानेश हटवार , किशोर ढोक, सौ. उज्ज्वला वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते. क्रांतिवीर सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मेरी माटी मेरा देश” अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सकाळी १० वाजता पंचप्रण शपथ विद्यार्थी व कर्मचारी वर्गानी घेतली. डॉ .ज्ञानेश हटवार यांनी “क्रांतिकारकांचे हौतात्मे, राष्ट्रभक्ती आपल्याला विसरून चालणार नाही , तर त्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे,” असे मार्गदर्शन केले. प्राध्यापक किशोर ढोक यांनी मतदार जागृती अभियानांतर्गत घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करून लोकशाही बळकट करावी , असे सांगितले.
यावेळी निखिल कुळमेथे, प्रणाली जगझाप या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ. सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम टोंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन साक्षी ठावरी हीने केले. यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक कमलाकर हवाईकर, प्रेमा पोटदूखे , संगीता जक्कुलवार , विद्यार्थी लव भोयर, अनिश भूसारी , कुश भोयर , हेलवटे यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक उपस्थित होते.






