spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी २५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण ५१९ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात‌ www.zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर रिक्त पदांकरीता इच्छुक उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या लिंकवर ४ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ च्या रात्री २३:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदन सादर करता येणार आहे. तसेच जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जि.प. चंद्रपूरच्या  www.zpchandrapur.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी  https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या संकेतस्थळावर ठराविक दिनांकापर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज सादर करतांना काही अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्रमांक 07172-255592 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवड मंडळ निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) यांनी केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी कळविले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!