गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा शेतशिवारात संतंतधार पावसाने काही दिवसांपासून शेतीचे कामे बंद होती. पावसाने उसंत घेतल्याने आज मंगळवारी शेतावर खत टाकण्याकरीता गेलेल्या एका महिलेवर विज पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना विठ्ठलवाडा शेतशिवारात घडली. योगिता प्रकाश खोब्रागडे असे मृतक महिलेचे नाव आहे. ती चेक विठ्ठलवाडा येथील रहिवासी होती.
गोंडपिपरी तालुक्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतीचे कामे बंद होती. दरम्यान पावसाने उसंत घेतल्याने शेतीची कामे जोमाने सुरू झाले आहेत. आज मंगळवारी खरीप हंगामात लागवड केलेल्या कापूस पिकाला खत देण्यासाठी योगिता प्रकाश खोब्रागडे ही पतीसोबत शेतात गेले होते. पाच वाजताच्या दरम्यान अचानक आकाशात मेघ दाटून आले.विजेचा कडकडाट सुरू झाला. याच या सुमारास योगीताच्या अंगावर विज पडून तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस मिळताच ठाणेदार जीवन राजगुरू, प्रेमदास चव्हाण,पुलगमकर यांनी शेतात जावून घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. प्रेत ताब्यात घेत उत्तरीय तपासनीसाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे पाठविण्यता आले. मृतक महिलेच्या पच्यात पती, दोन मुली, म्हातारे सासू सासरे असा आप्त परिवार असून योगीताच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.






