दि. २३ जुलै ला विकास ग्रुप शेगाव बु तर्फे ग्रामीण भागातून सर्वांच्या समोर आदर्श निर्माण करत पोलीस उप निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण करीत एका अति सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची तसेच छोट्याश्या खेड्यातील वरोरा तालुक्यातील गिरोला या गावाची कन्या तनुजा खोब्रागडे यांचा त्यांनी मिळवलेल्या यशाचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे यश संपादित करावे या उद्देशाने तसेच तनुजा यांच्या यशा बद्दल त्यांचा विकास ग्रुप शेगाव तर्फे सत्कार करुन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.






