सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
वरोरा : शेगाव (बु) येथील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक थांबण्याचे नाव घेत नाही. आष्टा, चंदणखेडा, पारोधी येथुन दिवसाढवळ्या वाळूचे उत्खनन सुरू असते. आज शेगाव मधील मुख्य बाजापेठेत सकाळी 11 च्या सुमारास जामा मस्जिद जवळ वाळू रिकामी करत असताना ट्रॉली उलटल्यामुळे दुचाकीचा चक्काचूर झाला. याच भागात मोठ्या प्रमाणात दुकानें असल्यामुळे व रहदारी खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकत होती पण सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. शेगाव (बु) मंडळात वाळूची लिलाव अद्यापही झालेला नाहीं त्यामुळे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेगांव (बु) येथे वाळू तस्करी ही मोठी डोकेदुखी बनल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वाळू तस्करांना प्रशासनाचा धाक राहिलेला नाही हेच यावरून स्पष्ट होत चाले आहे.
दिवसाढवळ्या गावाच्या मध्यभागातून वाळूची तस्करी होते तरी कशी? यात प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसून येत आहे.






