जि प. भद्रावतीचे आदर्श शिक्षक राजु हिवंज यांचे निधन
भद्रावती
सध्या तप्त उन्हाची दाहकता सुरू असताना आपली पटसंख्या कायम राखण्यासाठी विद्यार्थ्यांना शोधण्याची मोहीम भर उन्हात शिक्षक राबवत आहेत. यातच जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती येथील माध्यमिक चे आदर्श, विद्यार्थी प्रिय शिक्षक राजू हिवंज सर यांचे आज अकस्मात दुःखद निधन झाले.
शिक्षकांवर अनेक कामाचा भडीमार सातत्याने शासनामार्फत केला जात आहे. नेमका उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या कालावधीत शिक्षकांवर जनगणनेचे अतिरिक्त कार्य सोपवलेले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या टिकून राहावी यासाठी सूर्य आग ओकत असताना सुद्धा शिक्षक विद्यार्थी शोध मोहिमेसाठी पालकांना भेटी देत आहे. अशातच भर उन्हात शिक्षकांवर पुन्हा जनगणना 2027 ची जबाबदारी सोपवलेली आहे. येत्या 16 तारखेपासून शिक्षक घरगणनेच्या कामात व्यस्त होणार आहेत. त्यामुळे आपल्या वर्गाची विद्यार्थी संख्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना भर उन्हात भेटणे सुरू आहे. जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती येथील शिक्षक राजू हिवंज सर हे सुद्धा विद्यार्थी शोध मोहिमेत भर उन्हात फिरत होते. या दगदगीमध्ये त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. दवाखान्यात दोन तीन दिवस त्यांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आले. मात्र आज अचानक त्यांचे दुःखद निधन झाले.
सूर्य आग ओकत असताना भर उन्हात विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आले सर फिरत होते. ते घरी पोहचल्यावर त्यांना अचानक भोवळ आली. ही भोवळ उष्माघाताने सुद्धा असू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यांच्या अशा अकस्मात निधनाने शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यासोबतच शिक्षकात भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे. शिक्षक शाळेची पटसंख्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक संपर्क करतच आहे. याच कालावधीत प्रशासनाने ऐन सुट्टीच्या कालावधीत जनगणना 2027 च्या कार्यावर शिक्षकांना नेमलेले आहे. हे जनगणनेचे कार्य उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भर उन्हात दिल्याने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जनगणनेच्या कार्यात आतापर्यंत अनेक राज्यात उष्माघाताने शिक्षकांचे मृत्यु झाल्याच्या बातम्या या आधी प्रकाशित झालेल्या आहेत.






